दुबई येथे आखाती देशातील भव्य शिवजयंती साजरी करत रोवला अटकेपार झेंडा
दुबईत शिवरायांचा जयघोष
कोकणी नमन, ढोल-ताशाच्या गजराने इंटरनॅशनल स्कूल दुमदुमले
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यूएईमध्ये रविवारी (ता. १५) साजरी करण्यात आली. दुबईतील ग्लेंडल इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ॲड. जया सामंत उपस्थित होत्या.
आखातात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी अनेक सामाजिक कार्यक्रम इन्स्पायर इव्हेंट्स यांच्या माध्यमातून केले जातात. यंदाच्या शिवजयंती उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे शिवभक्त कोकण नमन मंडळ यांनी कोकणातील लोककला नमन यांचे अप्रतिम सादरीकरण केले. महाराष्ट्रातील २०हून अधिक कोकणी कलाकार या सादरीकरणात सामील झाले होते. यूएईतील एक हजाराहून अधिक मराठी व आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजक चंद्रशेखर जाधव, चैताली जाधव आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन शिवजयंती साजरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

