मिरा-भाईंदर महापालिका समुद्राचे पाणी गोडे करणार

मिरा-भाईंदर महापालिका समुद्राचे पाणी गोडे करणार

Published on

मिरा-भाईंदर महापालिका समुद्राचे पाणी गोडे करणार
महाराष्ट्र जीवन प्राधिकारणकडून अभिप्राय मागवला

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये वारंवार जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन जवळच असलेल्या समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनविण्याच्या पर्यायावर महापालिकेकडून विचार केला जात आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकारणकडून अभिप्राय मागवला आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेकडे स्वतःचा पाण्याचा एकही स्रोत नाही. त्यामुळे स्टेम प्राधिकरण व एमआयडीसी यांच्याकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर महापालिकेला अवलंबून राहावे लागते. मात्र, दोन्ही स्त्रोतांकडून मिळणारे पाणी शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे पडत आहे. सध्या शहराला दररोज २४० दशलक्ष लिटर पाणी आवश्यक आहे. मात्र, ४० दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे. मुंबईला लागून असल्याने मिरा-भाईंदरची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्याच्या तुटवड्यात वाढच होणार आहे. दुसरीकडे मिरा-भाईंदरसाठी सुरू असलेली सूर्या पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वित होण्याकरिता आणखी काही अवधी जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनविण्याच्या पर्यायाचा विचार केला जात आहे.

---------
- सल्लागाराची नियुक्ती
मिरा-भाईंदर तीन बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेले आहे. त्याचा फायदा घेऊन पाणीटंचाईच्या काळात हे पाणी पिण्यासाठी वापरण्यासंदर्भातील व्यवहार्यता तपासून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून मत मागवले आहे. विलविकरण (डीसॅलीनेशन) तंत्रज्ञानाच्या मदतीने हे पाणी पिण्यायोग्य व औद्योगिक आस्थापनांसाठी वापरण्याचा महापालिकेचा विचार आहे. प्राधिकरणाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेकडून सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com