लाडक्या भावाच्या जिल्ह्यात लाडक्या बहिणी असुरक्षित

लाडक्या भावाच्या जिल्ह्यात लाडक्या बहिणी असुरक्षित

Published on

लाडक्या भावाच्या जिल्ह्यातच बहिणी असुरक्षित?
२०२५ मध्ये महिलांवरील गुन्ह्यांचा वाढता आलेख
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. ही बाब पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. यामध्ये कौटुंबिक हिंसाचार, छळवणूक, अपहरण, हुंडाबळी, बलात्कार, विनयभंग, पोक्सो कायद्याअंतर्गत या गुन्ह्यांमध्ये २०२५ मध्ये इतर गुन्ह्यांपेक्षा वाढ झाली आहे. लाडक्या भावाच्या जिल्ह्यात लाडक्या बहिणींची सुरक्षा कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात एकूण पाच परिमंडळ आहेत. आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र हे ठाणे शहराच्या आजूबाजूच्या शहरात म्हणजे भिवंडीपासून कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या शहरांपर्यंत पसरले आहे. शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना यश येत असले तरी महिला सुरक्षेच्या गुन्ह्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या आकडेवारीवरून २०२४ वर्षापेक्षा २०२५ मध्ये महिला सुरक्षेची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

ओळखीच्या मंडळींकडून बलात्कार, विनयभंगाचे प्रकार अधिक
ठाण्यात बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांचाही वाढता आलेख दिसत आहे. बलात्कारामध्ये १८ वर्षांवरील गटात ९० घटनांनी वाढ झाली आहे. १८ वर्षांखालील गटात नऊ घटनांनी घटली आहे. बलात्कार, विनयभंग, पोक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींमध्ये अनोळखीपेक्षा ओळखीच्या मंडळींकडून हे प्रकार अधिक असल्याचे दिसत आहे.

या घटनांचा वाढता आलेख
गुन्ह्याचा प्रकार, २०२४ (गुन्हे) २०२५ (गुन्हे) वाढ/घट
कौटुंबिक हिंसाचार, ४६३ ६२२ १५९
हुंडाबळी ०६ १२ ६
अल्पवयीन मुलींचे अपहरण ८९१ ९८१ ९०
अल्पवयीन मुलांचे अपहरण ३९२ ४२४ ३२
बेपत्ता महिला २,५५४ २,५६० ६
आत्महत्येस प्रवृत्त करणे ११ ४९ ३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com