गिरणी कामगारांच्या घरासाठी १० मार्चला विधानभवनावर आंदोलन
गिरणी कामगारांच्या घरांसाठी १० मार्चला विधान भवनावर आंदोलन
गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात सभा; चिपळूण येथे १९ फेब्रुवारीला मेळावा
शिवडी, ता. १८ (बातमीदार) : गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांच्या घरांच्या प्रलंबित प्रश्नावर ग्रामीण पातळीवर चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. १४ कामगार संघटनांच्या सहभागातून स्थापन झालेल्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीची परळ येथे बैठक पार पडली. या बैठकीला सचिन अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मिल मजदूर संघ) यांच्या अध्यक्षतेखाली १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता विधान भवनावर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.
लढा समितीचे निमंत्रक व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथेही सभा पार पडली असून, गिरणी कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले.
येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी सकाळी ११ वाजता चिपळूण येथील आंबेडकर हॉल, चिंच नाका येथे गिरणी कामगारांची सभा आयोजित करण्यात आली आहे. खेड, मंडणगड, दापोली व संगमेश्वर येथील गिरणी कामगार व वारसदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोविंदराव मोहिते यांनी केले आहे. दरम्यान, राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची १७ फेब्रुवारी रोजी मजदूर मंझील येथे तातडीची बैठक पार पडली. गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरील लढा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. बैठकीस खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, शिवाजी काळे, साई निकम, सुरेश मोरे, मोहन पोळ आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

