जिल्हास्तरीय गणेशोत्सव स्पर्धेतील मानकरी मंडळांचा गौरव
जिल्हास्तरीय गणेशोत्सव स्पर्धेतील मानकरी मंडळांचा गौरव
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण; सांस्कृतिक वारशाच्या जतनाला प्रोत्साहन
अलिबाग, ता. १८ ( वार्ताहर) : सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ मधील जिल्हास्तरीय द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. द्वितीय क्रमांक श्री युवा मित्र मंडळ, पनवेल, नवी मुंबई यांना ४० हजार रुपये तर तृतीय क्रमांक सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, रोहा, रायगड यांना ३० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या निर्णयानुसार गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत असून या अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने तालुका, जिल्हा व राज्य अशा तीन स्तरांवर स्पर्धा राबविण्यात आली.
मंडळांची निवड करताना पारंपरिक कला सादरीकरण, दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन, महिला व दिव्यांगांसाठी उपक्रम, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, गडकिल्ले संवर्धन व स्वच्छता जनजागृती या निकषांचा विचार करण्यात आला. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक संत रोहिदास तरुण विकास मंडळ, महाड यांना राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

