रोहा-अष्टमी नगरपरिषदेतर्फे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक
रोहा-अष्टमी नगर परिषदेतर्फे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक
रोहा, ता. १८ (बातमीदार) : रोहा-अष्टमी नगर परिषद यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता काढण्यात येणार आहे. श्री राम मारुती चौक ते कुंडलिका नदी संवर्धन गार्डन यादरम्यान ही मिरवणूक मार्गक्रमण करणार असल्याची माहिती नगर परिषदेतर्फे देण्यात आली.
या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित राहणार आहेत. नगराध्यक्ष वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी व मुख्याधिकारी अजकुमार एडके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
या वेळी नगर परिषदेचे गटनेते, सभापती, नगरसेवक व स्वीकृत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी शहरात तयारीला वेग आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

