राजनंदिनी पवार बनली फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र!

राजनंदिनी पवार बनली फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र!

Published on

राजनंदिनी पवार बनली फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र!

मुंबई, ता. १८ : फ्यूचर वर्सिटी एज्युकेशन ग्रुप प्रस्तुत फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र २०२६ राज्यस्तरीय अंतिम फेरीत राजनंदिनी पवार हिने विजेतेपद पटकावले. वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात फॅशन, आत्मविश्वास, आधुनिक विचार आणि महिला सक्षमीकरण यांचा प्रभावी संगम पाहायला मिळाला.
या राज्यस्तरीय अंतिम फेरीचे आयोजन फ्यूचर वर्सिटी एज्युकेशन ग्रुपने मिस इंडिया संस्थेच्या संकल्पनेअंतर्गत केले होते. विशेष बाब म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी फ्यूचर वर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी केली. राज्यातील विविध भागांतून झालेल्या ऑडिशन्समधून ७००हून अधिक स्पर्धकांमधून १६ जणांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीत परिचय राउंड, रॅम्प वॉक आणि प्रश्नोत्तर फेरीतून स्पर्धकांचे सौंदर्य, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व यांचे मूल्यमापन करण्यात आले. स्पर्धेतील विविध उपश्रेणी पुरस्कारही जाहीर करण्यात आले. पारिनाज कूपर यांनी मिस ब्यूटीफुल स्माईल आणि मिस कॉन्जेनियलिटी हे दोन पुरस्कार मिळवले, तर समायरा शाह (मिस ग्लोइंग स्किन), आर्या खैरनार (मिस रॅम्पवॉक) आणि तमन्ना भारत (मिस फोटोजेनिक) यांनी अनुक्रमे आपापल्या गटांत बाजी मारली. संध्याकाळचा सर्वोच्च क्षण म्हणजे राजनंदिनी पवारला फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र २०२६चा मुकुट प्रदान करण्यात आला. फॅशन, वेलनेस, बिझनेस आणि सोशल इम्पॅक्ट क्षेत्रातील मान्यवर परीक्षकांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. परीक्षकांनी सौंदर्यासोबतच विचार, उद्देश आणि सामाजिक जाणिवेला प्राधान्य दिल्याचे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com