कोकेनसह एकाला येऊर येथून अटक ; ११ लाखांचा ऐवज जप्त

कोकेनसह एकाला येऊर येथून अटक ; ११ लाखांचा ऐवज जप्त
Published on

कोकेनसह एकाला येऊर येथून अटक
११ लाखांचा ऐवज जप्त; ठाणे गुन्हे अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : कोकेन हे अमली पदार्थ विक्रीसाठी करणाऱ्या इमरान बैतूलाह चौधरी या भंगारविक्रेत्याला ठाणे शहर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. येऊर येथील स्वानंद बाबा आश्रम लायन पार्कसमोर ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी २२ ग्रॅम वजनाच्या कोकेनसह रोख आणि मोबाईल फोन असा ११ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ठाण्याच्या स्वानंद बाबा आश्रम, लाइन पार्कसमोर एका आलिशान चारचाकीतून तीन जण येणार आहेत. त्यापैकी इमरान चौधरी हा कोकेन अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. यानुसार मंगळवारी (ता. १७) सायंकाळी त्या परिसरात सापळा रचून ठाणे पोलिसांनी इमरान चौधरी याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडून आठ लाख ८० हजार रुपये किमतीचा २२ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अमली पदार्थ आढळून आले. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com