घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये विकासकामांना सुरुवात
घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये विकासकामांना सुरुवात
मराठवाडा शिवमंदिर परिसरात बोअरवेल दुरुस्ती, रस्ता व गटर कामांना प्रारंभ
घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्वेतील नारायणनगर परिसरातील मराठवाडा शिवमंदिर येथे स्थानिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित कामांना गती देण्यात आल्याचे शिवेसेनेचे (शिंदे) नगरसेवक किरण लांडगे यांनी सांगितले.
मंदिर परिसरातील अनेक वर्षांपासून बंद पडलेला बोअरवेल स्थानिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यात आला. या बोअरवेलच्या माध्यमातून आता मंदिर परिसर तसेच सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेसाठी नियमित पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेच्या समस्येला मोठा दिलासा मिळणार आहे.
रस्ते व गटर दुरुस्तीला प्रारंभ
शिवमंदिर व सार्वजनिक शौचालय परिसरातील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. तसेच गटरांचीही दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक मंडळांच्या निवेदनाची दखल घेत गटर दुरुस्ती व पायवाट नूतनीकरणाच्या कामांना आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या कामांमुळे परिसरातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार असून, नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण मिळणार आहे.
स्थानिकांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात या भागातील उर्वरित विकासकामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील.
- किरण लांडगे, नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

