संत निरंकारी मिशनतर्फे जल संवर्धन मोहीम
संत निरंकारी मिशनतर्फे जलसंवर्धन मोहीम
मुंबई महानगर प्रदेशात ६७ ठिकाणी स्वच्छता
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : पर्यावरण रक्षण आणि जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात येत आहे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या ब्रीदवाक्याखाली रविवारी (ता. २२) सकाळी ८ वाजता सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर ही मोहीम राबवली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशासह कोकण आणि लगतच्या परिसरात एकंदर ६७ ठिकाणी हे अभियान राबवले जाईल. यात प्रामुख्याने कुलाबा ते भाईंदर, दादर ते मुलुंड आणि मानखुर्द, ठाणे, नवी मुंबई, उरण, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, वसई-विरार आणि पालघर परिसराचा समावेश आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विशाल उपक्रम देशभरातील १,५०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जाणार आहे. हे या मोहिमेचे चौथे वर्ष असून, यापूर्वीच्या तीन टप्प्यांतील यशानंतर आता हा टप्पा अधिक व्यापक स्वरूपात राबवला जात आहे. बाबा हरदेव सिंहजी यांच्या प्रेरणादायी शिकवणीतून २०२३ मध्ये भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात झाली होती. जेव्हा मन निर्मळ असते तेव्हाच निसर्ग स्वच्छ राहतो, हा विचार या मोहिमेचा गाभा आहे.
प्रमुख उद्दिष्टे
जलस्रोतांचे संरक्षण : नद्या, तलाव, सरोवरे, विहिरी आणि झरे यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांची स्वच्छता करणे.
जनजागृती : पाणी ही ईश्वराची अमूल्य देणगी असून तिचे रक्षण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे, ही भावना रुजवणे.
आरोग्य संदेश : मधुर समूह गायन आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून जलजन्य आजार टाळण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

