शिवजयंतीनिमित्त समता विद्या मंदिरची भव्य शोभायात्रा
शिवजयंतीनिमित्त समता विद्यामंदिरची भव्य शोभायात्रा
अफझल खान वधाच्या देखाव्याने वेधले लक्ष
घाटकोपर, ता. १९ (बातमीदार)ः साकीनाका येथील समता विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त भव्य आणि दिमाखदार शोभायात्रा काढत संपूर्ण परिसर शिवमय केला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवभूषा परिधान करून विविध ऐतिहासिक प्रसंगांचे जिवंत सादरीकरण केले.
या शोभायात्रेतील विशेष आकर्षण ठरला तो अफझल खान वधाचा प्रभावी देखावा. विद्यार्थ्यांच्या दमदार अभिनयामुळे उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. “जय भवानी, जय शिवाजी” तसेच “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
शोभायात्रेला शाळेच्या प्रांगणातून प्रारंभ होऊन परेरावाडी मार्गे पाइपलाइन, साकीनाका पोस्ट ऑफिस, साकीनाका जंक्शन, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड मार्गे असल्फा येथे समारोप झाला. मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
शाळेचे सचिव राजेश सुभेदार आणि कार्याध्यक्ष ज्योती सुभेदार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, स्मिता सुरवसे, प्रतीक्षा गोरे, वैशाली हांडे, भरत भोईर तसेच अन्य शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सचिव राजेश सुभेदार म्हणाले, “विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना शिवाजी महाराजांविषयी सखोल माहिती मिळावी, हा आमचा मुख्य उद्देश आहे. पाठ्यपुस्तकांतील इतिहासाचा भाग कमी होत असला तरी महाराजांची कीर्ती आणि कार्य प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे दरवर्षी शिवजयंतीनिमित्त ऐतिहासिक देखावे सादर करून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी आणि स्वराज्याची प्रेरणा जागृत करण्याचा आमचा प्रयत्न असतो.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

