‘शिवजन्म ते शिवराज्याभिषेक’ नाट्यमय सादरीकरणाने भारावले प्रेक्षक

‘शिवजन्म ते शिवराज्याभिषेक’ नाट्यमय सादरीकरणाने भारावले प्रेक्षक

Published on

‘शिवजन्म ते शिवराज्याभिषेक’ नाट्यमय सादरीकरणाने भारावले प्रेक्षक
घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) ः विक्रोळी येथील विद्या विकास शिक्षण संस्था तसेच घाटकोपरमधील स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटी येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘शिवजन्म ते शिवराज्याभिषेक’ असा संपूर्ण शिवचरित्राचा प्रवास नाट्यमय सादरीकरणातून रंगमंचावर साकारला.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग प्रभावी अभिनयातून उभे केले. शिवजन्म, बालपणातील संस्कार, स्वराज्य स्थापनेची शपथ, पराक्रम आणि अखेरचा शिवराज्याभिषेक असा प्रेरणादायी प्रवास सादरीकरणातून जिवंत झाला. ऐतिहासिक प्रसंगांचे जिवंत चित्रण आणि संवादफेकीमुळे उपस्थित प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले.
संस्थेचे सचिव डॉ. विनय राऊत व विश्वस्त मंडळ यांच्या संकल्पनेतून हा उत्सव आयोजित करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वारसा जपण्याचा आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वीपणे साकारला. याचप्रमाणे विकास महाविद्यालयातही स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले. संस्थेच्या प्रतिनिधी डॉ. मेघा परब यांनी शिवचरित्राच्या कालातीत प्रेरणेवर मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश दिला. ग्रंथपाल उदय कुलकर्णी यांनी राष्ट्रप्रेम व सामाजिक एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले, तर मामलेकर यांनी सादर केलेल्या शिवआरतीने वातावरण भक्तिमय आणि देशभक्तीने भारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com