राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे शहर महिलाध्यक्षपदी मनिषा भगत
शरद पवार पक्षाच्या ठाणे शहर महिलाध्यक्षपदी मनीषा भगत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : शरद पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी नगरसेविका मनीषा भगत यांची तर कार्याध्यक्षपदी साबिया मेमन आणि फुलबानो पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता घाग यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
मनीषा भगत यांची आक्रमक चेहरा अशी ओळख आहे. नुकत्याच झालेल्या ठाणे पालिकेच्या निवडणुकीत त्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत, तर साबिया मेमन आणि फुलबानो पटेल या शरद पवार पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्या असून, पक्षाच्या विविध आंदोलन, उपक्रमांमध्ये त्या हिरीरीने सहभागी होत असतात. मनीषा भगत, साबिया मेमन आणि फुलबानो पटेल यांच्या नियुक्तीमुळे शरद पवार पक्षाची ताकद अधिकच वाढणार असून, महिला विंग अधिक सक्षम होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितले.
दरम्यान, या नियुक्तीनंतर सुप्रिया सुळे, फौजिया खान, डाॅ. जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, रोहिणी खडसे, मनोज प्रधान यांचे आभार मानून ठाणे शहरातील महिला सुरक्षा आणि महिलांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण आक्रमक भूमिका घेणार आहोत. ठाणे महापालिकेच्या सभागृहात आणि सभागृहाबाहेरही महिलांच्या प्रश्नांवर आपण लढणार आहोत, असे मनिषा भगत यांनी सांगितले.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

