शहापुरात पोलिस पाटील पदे भरण्याची मागणी
शहापूर, ता. १९ (वार्ताहर) : तालुक्यातील गावांमध्ये रिक्त असलेली पोलिस पाटीलांची पदे भरण्याची मागणी भाजपचे माजी तालुका सरचिटणीस तुकाराम भाकरे यांनी केली आहे. त्यांनी या मागणीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे.
तालुक्यातील सुमारे ९७ गावांमध्ये पोलिस पाटीलांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, महसूल प्रशासनाशी समन्वय साधणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रशासनास सहकार्य करणे; तसेच सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. पोलिस पाटील हे सरकार आणि ग्रामीण जनतेमधील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करतात. त्यामुळे ही पदे रिक्त राहणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रतिकूल परिणाम करणारे ठरत असल्याचे भाकरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागातील कायदा, सुव्यवस्था अधिक सक्षम आणि प्रशासनाचे काम अधिक गतिमान करण्यासाठी पोलिस पाटील पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

