नेरूळमध्ये शिवजयंतीचा उत्साह
नेरूळमध्ये शिवजयंतीचा उत्साह
नेरूळ, ता. १९ (बातमीदार) : नेरूळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध सामाजिक संस्था, मंडळे व नागरिकांच्या पुढाकाराने शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
सकाळपासूनच परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना आकर्षक सजावट करण्यात आली होती.
छत्रपती शिवरायांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या असून युवक-युवतींनी भगवे फेटे परिधान करून जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. काही ठिकाणी शिवचरित्रावर व्याख्याने, पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, लहान मुलांसाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या. नेरूळमध्ये सर्वत्र भगवे झेंडे, रोषणाई आणि आकर्षक देखावे यामुळे शिवजयंतीचा जल्लोष अनुभवायला मिळाला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांना प्रतिसाद दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

