नेरूळ चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण
नवी मुंबईत शिवजयंतीचा उत्साह
नेरूळमधील नवीन अश्वारूढ पुतळ्यासमोर पहिल्यांदाच सोहळा
नेरूळ, ता. १९ (बातमीदार) ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबई पालिकेच्या वतीने गुरुवारी (ता. १९) विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तर महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुजाता पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. या वेळी उपमहापौर दशरथ भगत व आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. तर नेरूळ सेक्टर १ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळील चौकात स्थापित शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला महापौरांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक जयवंत सुतार, नगरसेवक रवींद्र इथापे, सुरेश शेट्टी, अंजली वाळुंज, भापकर, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे, नेरूळ विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, उमेश पाटील, प्रवीण गाडे, पंढरीनाथ चौडे आणि इतर मान्यवर आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्षवेधी सजावट
दोन्ही चौकात शिवरायांच्या पुतळ्याभोवताली आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. तसेच जयंतीच्या आदल्या दिवसापासूनच चौकांच्या चारही बाजूंना विद्युत दीपमाळांची रोषणाई करण्यात आली आहे. नेरूळ येथील चौकात नुकताच नोव्हेंबर २०२५ मध्ये शिवप्रभूंचा सिंहासनारूढ पुतळा स्थापित करण्यात आलेला असून, त्या ठिकाणी यावर्षी पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव साजरा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. शिवरायांच्या पुतळ्यावर असलेल्या मेघडंबरीला केलेली आकर्षक पुष्पसजावट लक्ष वेधत होती. दोन्ही ठिकाणी दिवसभर शिवचरित्रावर आधारित गीते, पोवाडे यांचे ध्वनिक्षेपकाव्दारे सादरीकरण होत असल्याने शिवरायांच्या नावाचा गजर नवचैतन्य निर्माण करणारा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

