घाटी मराठी संघटनेचा शिवजन्मोत्सव जल्लोषात

घाटी मराठी संघटनेचा शिवजन्मोत्सव जल्लोषात

Published on

कळंबोलीमध्ये १०१ मशालींद्वारे मानवंदना
स्वराज्याच्या ‘सुवर्ण होन’ची ४ फूट उंच प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू
पनवेल, ता. १९ (बातमीदार) ः कळंबोलीच्या घाटी मराठी संघटनेच्या वतीने यंदाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मध्यरात्री ठीक १२ वाजता १०१ मशालींची मानवंदना देत छत्रपती शिवजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. मशालींच्या तेजस्वी प्रकाशात महाराजांचा पाळणा आणून विधिवत आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
घाटी मराठी संघटना दरवर्षी शिवजयंतीनिमित्त काहीतरी वेगळे आणि ऐतिहासिक संदर्भ जपणारे उपक्रम राबवत असते. यंदा संघटनेचे अध्यक्ष पंकज सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून स्वराज्याचे पहिले चलन असलेल्या ‘सुवर्ण होन’ची तब्बल ४ फूट उंच आणि ८ फूट लांब भव्य प्रतिकृती साकारण्यात आली. या प्रतिकृतीने शिवभक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतले. अनेकांनी प्रतिकृतीसोबत छायाचित्रे काढून हा ऐतिहासिक क्षण जपला.
कार्यक्रमस्थळी आकर्षक विद्युत रोषणाई, भगवे ध्वज आणि पारंपरिक सजावट यामुळे वातावरण शिवमय झाले होते. कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर, नागरिक, युवक-युवती तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने इतिहासाची जाणीव आणि स्वराज्याच्या अभिमानाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न घाटी मराठी संघटनेने यशस्वीपणे केला असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. यंदाच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे घाटी मराठी संघटनेचा शिवजन्मोत्सव पनवेल परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com