टिटवाळ्यात शिवतेजाचा जयजयकार !

टिटवाळ्यात शिवतेजाचा जयजयकार !
Published on

टिटवाळ्यात शिवतेजाचा जयजयकार
३९६व्या शिवजयंतीनिमित्त अवघे शहर शिवमय
टिटवाळा, ता. १९ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त टिटवाळा शहर आज भगवेमय झाले होते. ढोल-ताशांचा गजर, लेझीमची साथ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी शहर दुमदुमले. ठिकठिकाणी निघालेल्या पालख्या, मिरवणुका आणि शिवप्रतिमांच्या पूजनाने स्वराज्याच्या संस्थापकाला मानाची मानवंदना देण्यात आली.

राजे ग्रुप व ग्रामस्थ मंडळाचा बारावा महोत्सव
गेल्या १२ वर्षांची परंपरा जपत महागणपती चौक येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवप्रतिमेचे विधिवत पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. टिटवाळा स्थानक परिसरात उभारलेली महाराजांची भव्य प्रतिमा शिवभक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. येथे मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
टिटवाळा पश्चिमेकडील जानकी विद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेली पालखी मिरवणूक लक्षवेधी ठरली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषेत लेझीम खेळत इतिहासाला उजाळा दिला. रिजन्सी सर्वम शिवजयंती उत्सव मंडळाने महाराजांच्या वेशभूषेतील मावळ्यांसह भव्य रथाची मिरवणूक काढली. पारंपरिक वाद्यांच्या निनादाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

खाकी वर्दीतील शिवप्रेम
नियोजित बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत असतानाच, टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला काळे, ज्ञानोबा इंद्राळे आणि कर्मचाऱ्यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com