कोकण पर्यटनासाठी 
शार्दुल, आयुष ब्रँड अँबेसिडर होणार

कोकण पर्यटनासाठी शार्दुल, आयुष ब्रँड अँबेसिडर होणार

Published on

पालघर, ता. १९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्लोबल कोकणचे अध्यक्ष गणेश नाईक, क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर, आयुष म्हात्रे यांच्या उपस्थितीत ग्लोबल कोकण महोत्सवाचा प्रारंभ बुधवारी (ता. १८) संध्याकाळी झाला. या वेळी शार्दुल ठाकूर आणि आयुष म्हात्रे यांनी कोकण पर्यटनाचा सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसिडर) होण्याची तयारी दर्शवली आहे. या वेळी गणेश नाईक यांच्या हस्ते या दोघांचाही सन्मान करण्यात आला.

माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र गावित, कार्याध्यक्ष वसई-विरारचे प्रथम महापौर राजीव पाटील, जिल्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, शिरगाव सरपंच घनश्याम मोरे, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, हेमंत पाटील, सिनेपत्रकार दिलीप ठाकूर, सिनेअभ्यासक अशोक राणे या मान्यवरांची महोत्सवाला उपस्थिती दर्शवली. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला सुमारे २५ हजार कोकणप्रेमींनी भेट दिली. आजपर्यंतचा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बीच फेस्टिव्हल ठरणार आहे. पुढील चार दिवसांत म्हणजेच रविवार (ता. २२)पर्यंत या महोत्सवाला चार लाखांहून अधिक कोकणप्रेमी आणि निसर्गप्रेमी भेट देतील, असा विश्वास ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव यांनी व्यक्त केला.

मराठी सिनेमा निर्मिती आणि पालघर जिल्हा या विषयात परिसंवादालाही सिनेरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, सिनेअभिनेते विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, अरुण नलावडे आणि अनेक मान्यवरांनी या परिसरात सहभाग घेतला. सिनेमाची लोकचळवळ सुरू करण्याचा निर्धार शिवस्वराज्यच्या माध्यमातूनही व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com