टरबूजावर साकारले छत्रपती शिवाजी महाराज

टरबूजावर साकारले छत्रपती शिवाजी महाराज

Published on

टरबूज, मोरपिसावर साकारले ‘शिवराय’!
कल्याणच्या कलाशिक्षकाची अनोखी मानवंदना
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवमय झाला असतानाच, कल्याणमधील एका कलाशिक्षकाने आपल्या अनोख्या कलेतून महाराजांना अभिवादन केले आहे. यश महाजन या कलाशिक्षकाने चक्क टरबूज आणि मोरपिसावर शिवरायांची आकर्षक कोरीव प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यश महाजन यांनी केवळ ब्लेडच्या साहाय्याने टरबूजावर अतिशय सूक्ष्म कोरीव काम करत महाराजांचा चेहरा साकारला. ही वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांना सुमारे दोन ते अडीच तासांचा अवधी लागला. टरबूजासोबतच त्यांनी मोरपिसावरही महाराजांचे चित्र रेखाटून आपल्या कलेचा जाज्वल्य आविष्कार सादर केला आहे. महाजन हे दरवर्षी शिवजयंतीनिमित्त वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून महाराजांना मानवंदना देतात. यापूर्वी त्यांनी भाकरी, तांदळाचे दाणे, पिंपळाचे पान, तुळशीचे पान, केळीचे पान, दगड आणि माती तसेच खडूवरील कोरीव काम करत शिवराय साकारले होते. रांगोळी, पोर्ट्रेट आणि कॅनव्हास पेंटिंगद्वारे ही शिवराय साकारले.

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा
कलेच्या माध्यमातून इतिहासाबद्दल आदर आणि प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद मानला जात आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीचे सध्या शालेय स्तरावर आणि कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com