पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी २१ फेब्रुवारीपासून

पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी २१ फेब्रुवारीपासून

Published on

खाकी वर्दीसाठी उमेदवारांचा कस लागणार
२१ फेब्रुवारीपासून ग्रामीण पोलिस भरतीची मैदानी चाचणी; चार हजार तरुणांचे भवितव्य पणाला

ठाणे, ता. १९ : ठाणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस शिपाई भरती प्रक्रियेने आता वेग घेतला असून, बहुप्रतीक्षित मैदानी चाचणीला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. १६७ रिक्त पदांसाठी तब्बल चार हजार ७०० उमेदवारांनी अर्ज केले असून, एका जागेसाठी २८ उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. मुंब्रा येथील मैदानावर ही भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ठाणे ग्रामीण पोलिस दलाने भरतीसाठी चोख नियोजन केले असून, २१ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी घेतली जाईल. मुंब्रा-कौसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियमवर पहाटे ४.३० वाजल्यापासूनच ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना वेळेपूर्वीच हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कागदपत्रांची अट कडक
उमेदवारांनी येताना ऑनलाइन अर्जासह मूळ कागदपत्रे आणि त्यांचा एक छायांकित संच सोबत आणणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, सर्व कागदपत्रे ही ७ डिसेंबर २०२५ पूर्वीचीच असावीत, अशी अट घालण्यात आली आहे. अपूर्ण कागदपत्रे असल्यास उमेदवाराला चाचणीतून बाद केले जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

गैरप्रकारांवर पोलिसांची करडी नजर
भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे. उत्तेजक द्रव्ये किंवा अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या उमेदवारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच मैदानावर धावताना ‘स्पाइक शूज’ वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. भरतीदरम्यान काही शारीरिक त्रास जाणवल्यास तातडीने तेथील वैद्यकीय पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारांसाठी आवश्यक कागदपत्रे
ऑनलाइन अर्ज आणि प्रवेशपत्राच्या २ प्रती.
६ पासपोर्ट साईज रंगीत फोटो व आधार कार्ड.
इयत्ता १२ वी गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र.
वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला).
अधिवास प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र
विशेष आरक्षण प्रमाणपत्रे (ईडब्ल्यूएस, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, होमगार्ड, माजी सैनिक, अनाथ, इ.).

भरती प्रक्रियेचे वेळापत्रक
वेळ : २१ फेब्रुवारीला सकाळी ४.३० वाजल्यापासून प्रक्रिया सुरू होईल.
ठिकाण : मौलाना अबुल कलाम आझाद टीएमसी स्टेडियम, एमएम व्हॅली, कौसा, मुंब्रा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com