उरणमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
उरणमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांची वेशभूषा करुन लेझीम मिरवणूक, परिसर भगवेमय
उरण, ता. १९ (वार्ताहर) ः उरण तालुक्यासह शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळा, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच तालुक्यात ढोल-ताशांच्या गजरात वातावरण दुमदुमले होते.
शाळेतील लहान मुलांनी शिवरायांच्या वेषभूषेत आकर्षक वेश परिधान करून लेझीमच्या तालावर मिरवणूक काढली. मुलांच्या जोशपूर्ण सादरीकरणामुळे नागरिकांनी मोठ्या उत्साहात टाळ्यांचा कडकडाट स्वागत केले. मिरवणुकीत भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि पारंपरिक पोशाखामुळे संपूर्ण परिसर भगवेमय झाला होता. यावेळी बाईक रॅली, रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील गावागावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा व शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अनेक ठिकाणी शिवचरित्रावर आधारित देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. नागरिक, पालक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिवजयंतीनिमित्ताने तरुण पिढीमध्ये इतिहासाची जाणीव आणि स्वाभिमान जागृत व्हावा हाच उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

