पालिका व टाटा स्मारक रुग्णालय यांचा संयुक्त उपक्रम; व्यसनमुक्ती समुपदेशनाचाही समावेश

पालिका व टाटा स्मारक रुग्णालय यांचा संयुक्त उपक्रम; व्यसनमुक्ती समुपदेशनाचाही समावेश
Published on

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष कर्करोग तपासणी शिबिरे
पालिका व टाटा स्मारक रुग्णालय यांचा संयुक्त उपक्रम; व्यसनमुक्ती समुपदेशनाचाही समावेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अविरत कार्य करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष कर्करोग तपासणी व जनजागृती आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. ‘एफ दक्षिण’ विभागाच्या पुढाकाराने आणि टाटा स्मारक रुग्णालयाच्या सहकार्याने ही शिबिरे महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी होणार आहेत.
स्वच्छता कर्मचारी दररोज कचरा संकलन, रस्ते व नाले स्वच्छता, तसेच सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करताना दुर्गंधी, धूळ आणि इतर घातक घटकांच्या संपर्कात येतात. काही कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखू व मद्यपानाच्या व्यसनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. उपआयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे आणि एफ दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती वृषाली इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात टाटा स्मारक रुग्णालयाच्या कर्करोग प्रतिबंध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांची तपासणी केली.
महिला कर्मचाऱ्यांना स्तन कर्करोगाची पूर्वलक्षणे ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठी आधुनिक ‘एचपीव्ही सेल्फ सॅम्पलिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून तपासणी करण्यात आली. तंबाखू व मद्यपानाच्या दुष्परिणामांविषयी माहिती देत व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनही करण्यात आले. गरज भासल्यास पुढील तपासणी व उपचारासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना टाटा स्मारक रुग्णालयाच्या कर्करोग प्रतिबंध विभागात पाठविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com