बदलापूरमध्ये बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा
बदलापूर, ता. १९ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नव्या कारभाराची सुरुवात ठोस आणि भावनिक निर्णयाने झाली आहे. पहिल्याच सर्वसाधारण सभेत बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. निवडणूक प्रचारादरम्यान किसन कथोरे यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी झाल्याने भाजपने आश्वासनपूर्ती केल्याचा दावा केला आहे.
नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. बदलापूर पूर्वेकडील जुन्या नगर परिषद कार्यालयाजवळील आदर्श शाळेची जागा हस्तांतरित करून त्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुतळा पूर्णाकृती व भव्य असावा; तसेच प्रस्तावित ५० लाख रुपयांचा निधी अपुरा असल्याने तो वाढवावा, अशी मागणी नियोजन सभापती संभाजी शिंदे, आरोग्य सभापती किरण भोईर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केली. मुंबईतील काळा घोडा परिसरातील भव्य पुतळ्याच्या धर्तीवर स्मारक उभारण्याची सूचना गटनेते शरद तेली यांनी मांडली.
‘स्टॅच्यू सिटी’कडे वाटचाल
शिवसेना गटनेते श्रीधर पाटील यांनी निर्णयाचे स्वागत करताना उल्हास नदीवर भगवान शंकराचा पुतळा, सोनिवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अशा प्रस्तावांमुळे बदलापूर ‘स्टॅच्यू सिटी’कडे वाटचाल करत असल्याचे नमूद केले. मात्र, पुतळ्यांबरोबरच इतर महत्त्वाच्या विकासकामांकडेही दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

