दिवा रेल्वे स्थानकात अर्थिंगचे काम करताना विजेचा धक्का
दिवा रेल्वे स्थानकात अर्थिंगचे काम करताना विजेचा धक्का
कामगाराच्या मृत्यूप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : दिवा रेल्वे स्थानक परिसरात अर्थिंगचे काम सुरू असताना विजेचा तीव्र धक्का लागून राजस्थान येथील खंगाराम रावल (वय ३७) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी असिस्टंट इंजिनियर दीपक पांडे आणि ठेकेदार राहुल पांचाळ या दोघांविरोधात खंगाराम रावल यांच्या भावाने तक्रार दिली आहे. यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंगाराम रावल (वय ३७) २२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी दिवा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ९ वरील तिकीट काऊंटर बाहेरील भागात अर्थिंगसाठी खड्डा खोदण्याचे काम करत होते. यादरम्यान भवरलाल यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत ते गंभीररित्या जखमी झाले होते. रेल्वे पोलिसांनी खंगाराम रावल यांना तात्काळ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर रावल यांना मृत घोषित केले. रावल यांच्या मृत्यूप्रकरणी दीपक पांडे आणि राहुल पांचाळ या दोघांनी कोणतेही सुरक्षिततेची उपकरणे न पुरविल्यामुळे खंगाराम रावल यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

