

केडीएमसीत शिवजन्मोत्सव जल्लोषात
चिमुकल्या मावळ्यांच्या सादरीकरणाने वेधले लक्ष
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. महापालिका मुख्यालय, विभागीय कार्यालये आणि शहरातील मुख्य चौकांमध्ये शिवरायांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महापालिका मुख्यालयात राज्यगीत गायनाने झाली. या वेळी महापौर हर्षाली चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या सोहळ्याला महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त कांचन गायकवाड आणि अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवलीत प्रतिमेचे पूजन
कल्याण पश्चिमेकडील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महापौर आणि आयुक्तांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. डोंबिवलीत उपमहापौर राहुल दामले यांच्या हस्ते महापालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयातील आणि मानपाडा रोडवरील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या वेळी उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, रामदास कोकरे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रम
यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे सादरीकरण ठरले. बारावे (शाळा क्र. ६८), धाकटे शहाड (शाळा क्र. ३३) आणि उंबर्डे (शाळा क्र. १२) मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या या बहारदार सादरीकरणाने उपस्थित मान्यवर आणि नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.