अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
Published on

मंजूर निधीतील कामे तातडीने पूर्ण करा
अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : अन्न औषध प्रशासन विभागाच्या सक्षमीकरणासाठी नियोजित कामे तातडीने पूर्ण करावीत. यासाठी मंजूर केलेला निधी कालमर्यादेत खर्च होईल, यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच आढावा बैठक झाली. बैठकीसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे प्रधान सचिव धीरज कुमार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर दुबे पाटील, विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, सहआयुक्त मंगेश माने यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री झिरवाळ म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागातील बळकटीकरणासाठी व विकासासाठी शासनाने ७२ कोटी रुपयांची तरतूद करून दिली आहे. त्यातील कामे कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात. विभागाच्या अंतर्गत प्रयोगशाळांचे सक्षमीकरण, बांधकामे आदी विकासकामांना गती दिली जावी. या वेळी राज्यातील अन्न नमुने तपासणी प्रयोगशाळांच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. अन्न भेसळ रोखण्यासाठी या प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यासाठी कार्यवाही केली जाईल. तसेच शासकीय प्रयोगशाळाव्यतिरिक्त मान्यता दिलेल्या खासगी प्रयोगशाळांच्या बाबत माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com