

प्रवाशांची आर्थिक लूट थांबणार
सह्याद्रीनगर ते कल्याण स्थानक बस पुन्हा धावली; आता १० रुपयांत प्रवास
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली मार्ग क्रमांक तीन (साई चौक- सह्याद्रीनगर- कल्याण स्थानक) ही बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेना शहरप्रमुख तथा परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही सेवा आज (गुरुवार)पासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे.
खडकपाडा येथील साई चौक येथे या बससेवेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून आणि बसला भगवा झेंडा दाखवून प्रवासाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख सुनील वायले, नगरसेवक किरण भांगले, रूपेश सकपाळ, नगरसेविका शालिनी वायले, प्रमिला पाटील, प्रज्ञा वायले, युवासेना पदाधिकारी अनिरुद्ध पाटील, प्रथमेश पाटील यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
साई चौक ते कल्याण स्थानक हे साधारण चार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना रिक्षाला २५ ते ३० रुपये मोजावे लागत होते; मात्र आता केडीएमटीच्या बसमुळे हाच प्रवास अवघ्या १० रुपयांत पूर्ण होणार असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि नोकरदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन ही बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून, यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचे हाल कमी होतील, असा विश्वास रवी पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.
असा असेल बसचा मार्ग
साई चौक- साईबाबा मंदिर- ‘ब’ वॉर्ड- संघवी इस्टेट- इंदिरा बंगला- आरटीओ- सह्याद्रीनगर- कोकण वसाहत- सह्याद्रीनगर फाटा- बिर्ला कॉलेज- इंदिरानगर- भवानी चौक- प्रेम ऑटो- पौर्णिमा चौक- सिंडिकेट- स्टेट बँक- बाईचा पुतळा- रामबाग- कल्याण स्थानक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.