नवी मुंबईत शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह

नवी मुंबईत शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह
Published on

​नवी मुंबई, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत गुरुवारी (ता. १९) उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती, सकल मराठा समाज आणि लोकशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी (ता. १८) रात्री १० ते आज पहाटे २ या वेळेत अत्यंत दिमाखदार जन्मोत्सव सोहळा पार पडला.

गेल्या सहा वर्षांपासून प्रत्येक वर्षी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री शिवजयंती साजरी करण्याची नवी मुंबईतील ही परंपरा मुंबई उपनगरातील एकमेव मानली जाते. मध्यरात्री ठीक १२ वाजता शिवरायांचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी आणि बाल शिवबाचा पाळणा या कार्यक्रमाने उपस्थित शिवप्रेमींचे डोळे दिपवून टाकले. ​वाशी येथील अश्वारूढ पुतळ्याला पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, उरण नगराध्यक्षा भावना घाणेकर, माथाडी कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, फटाक्यांच्या आतषबाजीने ​या सोहळ्यात महाराष्ट्राच्या मातीतील कलागुणांचे दर्शन घडले. शाहीर वैभव घरत यांनी सादरीकरण केलेल्या शिवचरित्र पोवाड्यांमुळे वातावरण शिवमय झाले होते. युवकांनी सादर केलेल्या साहसी खेळांनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. शिवरायांच्या पुतळ्याभोवती केलेली फुलांची सजावट आणि डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई हे आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरले होते.

​याप्रसंगी माजी नगरसेवक सूरज पाटील, नगरसेविका सायली शिंदे, अंजली वाळुंज, नगरसेवक भाऊ भापकर, प्रकाश मोरे, शशिकांत राऊत, मुनावर पटेल, सचिन लवटे, अमित मेढकर, रॉबिन मढवी, पंचायत समिती सदस्य नितीन काळे आदींचा सत्कार करण्यात आला. समाजसेवक विजय वाळुंज, सुरेश सपकाळ, सुनील म्हस्कर, उद्योजक अविनाश बांगर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली, तसेच प्रशासकीय अधिकारी आणि शहरातील नागरिक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे संस्थापक विनोद पोखरकर, उत्सव समितीचे अध्यक्ष विलास सातकर, कार्याध्यक्ष सुरेश विश्वासराव, खजिनदार संदीप तनपुरे, सचिव विजय देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल बांगर, विजय खोपडे, राजू गावडे, अशोक काटे, रवींद्र कदम, नेताजी कदम, किरण बोडके, योगेश चव्हाण, विष्णू थोरात, राकेश थोरात यांनी नियोजनात परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com