उलवेच्या शगुन चौकात नियमांची पायमल्ली

उलवेच्या शगुन चौकात नियमांची पायमल्ली

Published on

उलवेच्या शगुन चौकात नियमांची पायमल्ली
सिग्नल आहे पण शिस्त नाही!
वाहतूक पोलिसांचा अभाव; सिग्नल तोडणाऱ्यांवर कारवाईची नागरिकांची मागणी
उलवे, ता. १९ (बातमीदार) : उलवे नोडमधील शगुन चौक येथे वाहतूक सिग्नल कार्यरत असतानाही वाहनचालकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. लाल सिग्नल असतानाही दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने बेधडकपणे चौक ओलांडत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. हा चौक परिसरातील सोसायट्या, बाजारपेठ, शाळा व सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्यामुळे येथे दिवसभर मोठी वर्दळ असते. विशेषतः संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे.
याशिवाय काही वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहन चालवत असल्याने पादचाऱ्यांसह इतर वाहनधारकांचे जीव धोक्यात येत आहेत. चौकात वाहतूक पोलीस किंवा वार्डनची नियमित उपस्थिती नसल्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही भीती उरलेली नाही. त्यामुळे वाहतूक नियंत्रणाचा पूर्णपणे फज्जा उडत आहे.
स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमावेत, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सिग्नल तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच ‘नो एन्ट्री’चे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
चौकट
अपघाताचा धोका
शगुन चौकातील सिग्नल असूनही वाहनचालकांकडून सर्रास नियमभंग होत आहे. वाहतूक पोलिसांचा अभाव, चुकीच्या दिशेने होणारी वाहतूक आणि सिग्नल तोडण्याच्या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तातडीने कडक अंमलबजावणीची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com