‘दरवाढ होणार नाही’च्या घोषणेनंतर लगेच यू-टर्न?
मतदान संपताच सत्ताधाऱ्यांचा ‘यू-टर्न’
उल्हासनगरकरांचे ‘पाणी’ महागणार?; विशेष महासभेकडे शहराचे लक्ष
उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : निवडणुकीच्या काळात पाणी दरवाढ रद्द केल्याचा गाजावाजा करून दिलेले आश्वासन आता हवेत विरण्याची चिन्हे आहेत. निवडणुका पार पडल्यानंतर आयोजित पहिल्याच विशेष महासभेत पाणी दरवाढीचा प्रस्ताव अजेंड्यावर आल्याने उल्हासनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी (२० फेब्रुवारी) होणारी ही महासभा आता केवळ प्रशासकीय विषय न राहता राजकीय ‘विश्वासार्हतेची’ परीक्षा ठरणार आहे.
काही महिन्यांपूर्वी महापालिकेने महसूल वाढवण्यासाठी पाणीदरात मोठी वाढ प्रस्तावित केली होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर जनतेचा रोष पाहता, आमदार कुमार आयलानी यांनी राज्य स्तरावर पाठपुरावा करून ही दरवाढ स्थगित केल्याचे जाहीर केले होते. यामुळे मतदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पुन्हा तोच प्रस्ताव समोर आल्याने नागरिकांमध्ये "आमची फसवणूक झाली" अशी भावना निर्माण झाली आहे. महापालिकेच्या मते, वाढते वीजबिल, देखभाल खर्च आणि शहरासाठी स्वतंत्र जलस्रोत उभा करण्यासाठी निधीची अत्यंत गरज आहे. त्यामुळे दरवाढ अटळ असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
नागरिकांचा रोष
सेवा द्या, मगच पैसे घ्या, अशी भूमिका सामान्य नागरिकांनी घेतली आहे. शहरातील अनेक भागांत अजूनही अनियमित पाणीपुरवठा, कमी दाब आणि गळतीची समस्या कायम असताना ही दरवाढ कशासाठी, असा प्रश्न व्यापारी आणि सामाजिक संघटनांनी उपस्थित केला आहे.
सत्ताधाऱ्यांची कोंडी
निवडणुकीपूर्वीची आश्वासने आणि आताचा अजेंडा यांचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मतदारांनी सत्ताधाऱ्यांवर ‘विश्वासघाताचा’ आरोप करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. २० फेब्रुवारीची ही सभा वादळी ठरण्याची शक्यता असून, विरोधक या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

