लोककल्याणकारी राजाची महती घरोघरी

लोककल्याणकारी राजाची महती घरोघरी

Published on

लोककल्याणकारी राजाची महती घरोघरी

वसई, ता. १९ (बातमीदार) : अन्यायाविरुद्ध उठाव करणारे लोककल्याणकारी राजाची महती घरोघरी प्रेरणा देणारी ठरावी यासाठी राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती असणारी दिनदर्शिका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वसईत प्रकाशित करण्यात आली. ही संकल्पना ज्येष्ठ समाजसेवक तथा नगरसेवक चंद्रशेखर धुरी यांनी मांडली आहे.
याप्रसंगी माजी महापौर नारायण मानकर, नगरसेवक चंद्रशेखर धुरी, कल्पेश मानकर, अजय रॉड्रिग्ज, माजी नगरसेवक विजय वर्तक, रवींद्र मांजरेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नलावडे, बहुजन विकास आघाडी आयटी सेलचे उपाध्यक्ष दीपक नाईक या वेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीयांच्या हृदयात आहेत. शिवनेरी किल्ल्यावर जन्म आणि रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. जिजामाता आणि दादोजी कोंडदेव यांचे संस्कार लाभले. गडकिल्ल्यांची संपूर्ण माहिती अवगत व्हावी याकरिता घरोघरी या दिनदर्शिकेचा फायदा होणार आहे, असे माजी महापौर नारायण मानकर यांनी या वेळी सांगितले.
या दिनदर्शिकेत शिवनेरी, सिंधुदुर्ग, तोरणा, देवगिरी, प्रतापगड, हरिश्चंद्रगड, सिंहगड, विसापूर, रायगड, लोहगड, राजगड, तिकोणा या किल्ल्यांचे छायाचित्र व शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची व गडांची माहिती विशद करण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी महाराज यांचे शौर्य, मराठ्याची ताकद सर्वदूर जाईल व विचारांनी तरुणांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल, असा उद्देश धुरी यांनी ठेवून संकल्पना दिनदर्शिकेतून समोर आणली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी अन्यायी सत्तेविरुद्ध उठाव केला. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. वेगवान निर्णय क्षमता स्वराज्य, स्वाभिमान ध्येर्य यांचे प्रतीक असणारे छत्रपती शिवाजी महाराज राजांची महती घरोघरी प्रेरणा निर्माण करण्यासाठी अनमोल आहे. म्हणून गडाची माहिती असणारी दिनदर्शिका प्रकाशित करण्याची संकल्पना आली, असे नगरसेवक चंद्रशेखर धुरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com