२४ तासांत तपास पूर्ण; दोषारोपपत्र दाखल

२४ तासांत तपास पूर्ण; दोषारोपपत्र दाखल

Published on

२४ तासांत तपास पूर्ण
दोषारोपपत्र दाखल ः आरोपीस १ वर्ष सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करून गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्याचा आदर्श ठाणे ग्रामीण पोलिसांनी घालून दिला आहे. एका गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्रदाखल केले. या प्रकरणाचा खटला फास्ट-ट्रॅक पद्धतीने चालवून न्यायालयाने आरोपीला १ वर्ष सक्तमजुरी आणि दंड सुनावला आहे.
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी महिला विषयक गुन्ह्यांचा तपास फास्ट-ट्रॅकवर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मुरबाड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्यात तत्कालिन पोलिस निरीक्षक संदीप गिते आणि तपास अधिकारी युनुस तडवी यांनी तत्परता दाखवली. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करून २४ तासांच्या आत सर्व तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुरावे गोळा केले व मुरबाड न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणाचा खटला फास्ट-ट्रॅक पद्धतीने चालविण्यात आला. अवघ्या सहा महिने २७ दिवसांत न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत १ वर्ष सक्त मजुरी आणि १ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात शासकीय अभियोक्ता ॲड. लिना साठे यांनी प्रभावी बाजू मांडली. या कारवाईत पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लाड, पोलिस निरीक्षक संदीप गिते व दादा ऐडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com