सीएसएमटी स्थानकावर गडकिल्ल्यांचे आकर्षक प्रदर्शन

सीएसएमटी स्थानकावर गडकिल्ल्यांचे आकर्षक प्रदर्शन
Published on

सीएसएमटी स्थानकावर गडकिल्ल्यांचे आकर्षक प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्मवर गडकिल्ल्यांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसेच अनेक रेल्वे स्थानकांवरील उद्घोषणांमधून शिवगीतांचे प्रसारण करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण स्थानक परिसर शिवमय झाल्याचे वातावरण अनुभवायला मिळाले.
शिवकालीन इतिहासाची ओळख करून देणाऱ्या या सीएसएमटी स्थानकातील प्रदर्शनात महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. विशेषतः सिंधुदुर्ग किल्ला, सुवर्णदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, रायगड किल्ला आणि प्रतापगड किल्ला आदी गडांच्या देखण्या प्रतिकृतींनी प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी थांबून किल्ल्यांची माहिती जाणून घेत छायाचित्रे काढली. यासोबतच शिवजयंतीचे औचित्य साधत मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकांवरील उद्घोषणांमधून शिवगीतांचे प्रसारण करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण स्थानक परिसर शिवमय झाल्याचे वातावरण अनुभवायला मिळाले. प्रवाशांनीही थांबून उद्घोषणांमधील शिवगीतांचा आस्वाद घेतला. दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे गडसंवर्धन, स्वच्छता मोहिमा, ऐतिहासिक जनजागृती उपक्रम राबविले जातात. या सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे या वेळी पाहायला मिळाले. शिवजयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारशाबद्दल जनजागृती होण्यास मदत होत असल्याची भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. स्थानक परिसर दिवसभर शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com