अलिबागमध्ये शिवजयंतीचा उत्साह

अलिबागमध्ये शिवजयंतीचा उत्साह
Published on

अलिबागमध्ये शिवजयंतीचा उत्साह
सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुकांतून छत्रपतींना अभिवादन
अलिबाग, ता. १९ (वार्ताहर) : अलिबाग शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गुरुवारी (ता.१९) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जोगळेकर नाका तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामाजिक संस्था व राजकीय पक्षांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिरे आणि जनजागृतीपर उपक्रमही आयोजित करण्यात आले होते.
अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, नगरसेवक प्रदीप नाईक, अंकित बंगेरा उपस्थित होते. नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजन्मापासून अफजलखान वधापर्यंतचा इतिहास नृत्याविष्कारातून सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विविध संघटनांच्या भव्य मिरवणुका शहरातून काढण्यात आल्या. जिल्हा प्रशासन व स्पर्धा विश्व अकॅडमीच्या वतीने पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी किशन जावळे, तपस्वी गोंधळी यांच्यासह विद्यार्थी शिवकालीन वेषभूषेत सहभागी झाले होते.
चौकट :
राजिपमध्ये अभिवादन
रायगड जिल्हा परिषद कुंटेबाग येथील कार्यालयातही शिवजयंतीनिमित्त अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रियदर्शनी मोरे, जालिंदर पठारे, विशाल तनपुरे, राहुल कदम, महारुद्र नाळे, विनायक तेलंग यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com