मिलापनगरात खिडकीचे ग्रील तोडून वृद्ध महिलेच्या घरात तिघांचा प्रवेश करून दरोड्याचा प्रयत्न

मिलापनगरात खिडकीचे ग्रील तोडून वृद्ध महिलेच्या घरात तिघांचा प्रवेश करून दरोड्याचा प्रयत्न

Published on

खिडकीचे गज तोडून दरोड्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ ः डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर या बंगल्यांच्या परिसरात मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (ता. १५) मध्यरात्रीच्या सुमारास अभिनव सहकारी बँकेसमोरील एका बंगल्यात तिघा दरोडेखोरांनी खिडकीचे गज तोडून प्रवेश केला. बँकेसमोरील या बंगल्यात एक वृद्ध महिला एकटीच राहत असून, दरोडेखोरांच्या हातात कोयते व इतर हत्यारे असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, त्याच रात्री एक वाजून २५ मिनिटांच्या दरम्यान एका संशयिताने बंगल्याची रेकी केल्याचेही सीसीटीव्हीत दिसत आहे.
रविवारी (ता. १५) घरात हालचाल झाल्याचे लक्षात येताच व वृद्ध महिला जागी झाल्याचे समजताच तिघा दरोडेखोरांनी तातडीने घरातून पळ काढला. घाबरलेल्या महिलेने तत्काळ शेजाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळविले. माहिती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसरात शोधमोहीम राबवली. दरोडेखोरांना पकडण्यासाठी विशेष पथक रवाना केले; मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.
..............
मिलापनगर येथील वस्ती प्रामुख्याने कारखानदार, डॉक्टर, सीए, वकील तसेच शासकीय व खासगी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची असल्याने येथे सुरक्षेच्या विशेष उपाययोजना करण्याची गरज असून, रात्री व पहाटेच्या सुमारास पोलिस गस्त वाढवून संबंधित दरोडेखोरांना तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी मिलापनगर रेसिडेन्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांनी मानपाडा पोलिसांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com