बनावट विदेशी मद्यावर 
उत्पादन शुल्कची कारवाई

बनावट विदेशी मद्यावर उत्पादन शुल्कची कारवाई

Published on

पनवेल, ता. १९ (बातमीदार) : राज्य उत्पादन शुल्क विभाग पनवेल ग्रामीण पथकाने उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याविरोधात मोठी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत दोन्ही ठिकाणांहून एकूण ११ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जुना मुंबई-पुणे महामार्गावर पोयंजे येथे दारूबंदी गुन्ह्याच्या अनुषंगाने बुधवारी (ता. १८) सापळा रचण्यात आला होता. तपासादरम्यान एका चारचाकी वाहनातून विविध नामांकित ब्रँडच्या बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या, दोन मोबाईल फोन, तसेच संबंधित वाहन असा सुमारे पाच लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणातील संशयित आरोपींकडून अधिक चौकशी केली असता तुपगाव, चौक येथील शेतातील घरात बनावट मद्यसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकून बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या, देशी मद्याच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे, मोबाईल आदी साहित्य असा सुमारे पाच लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये एकूण ११ लाख ३८ हजारांचा साठा हस्तगत करण्यात आला असून, बिनू कल्लूर, विघ्नेश्वर एम. एस. आणि बिजू उरथ या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com