श्श्रीवर्धनमध्य प्रथमच शिवकालीन शस्त्र व नाणी प्रदर्शन
श्श्रीवर्धनमध्य प्रथमच शिवकालीन शस्त्र व नाणी प्रदर्शन
श्रीवर्धन, ता. १९ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा आणि स्वराज्यकालीन वैभवाचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी श्रीवर्धन येथे प्रथमच शिवकालीन शस्त्र व नाणी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. शिवरुद्र मर्दानी आखाडा, श्रीवर्धन यांच्या वतीने नगरपरिषद शाळा क्रमांक १ येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या या प्रदर्शनाला नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तरुणांना शिवकालीन युद्धनीती, शस्त्रांचा वापर तसेच त्या काळातील अर्थव्यवस्था आणि व्यापारपद्धती यांची माहिती व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. प्राचीन चलनप्रणालीपासून ते कलाकुसरीपर्यंत अनेक ऐतिहासिक पैलूंचे दर्शन या प्रदर्शनातून घडले. त्यामुळे इतिहास अभ्यासकांसह विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन अभ्यासपूर्ण ठरले.
यावेळी मराठा साम्राज्याच्या युद्धकलेचे वैभव दर्शवणारी विविध शस्त्रे आणि विविध कालखंडातील नाण्यांचा दुर्मिळ संग्रह पाहण्याची संधी नागरिकांना मिळाली. स्वराज्य निर्मितीत वापरण्यात आलेल्या शस्त्रांचे प्रत्यक्ष दर्शन घडल्याने उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
चौकट :
प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण
मराठा ढोप, तेगा, खंडा, सरपट्टा, पट्टीसा, माडू, विविध प्रकारचे कुंत (भाले), दांडपट्टा, कट्यार, विजयनगरी कट्यार यांसह शिवकालीन, मुघल, ब्रिटिशकालीन व जुन्या भारतीय नाण्यांचा दुर्मिळ संग्रह मांडण्यात आला होता.
कोट
“ज्या शस्त्रांनी स्वराज्याची निर्मिती केली, त्यांची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि युद्धकलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत जावा, यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे.”
— शैलेंद्र गंगाराम ठाकूर, संस्थापक अध्यक्ष, शिवरुद्र मर्दानी आखाडा, श्रीवर्धन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

