एसटी-एर्टिगा भीषण अपघात; १० दिवस मृत्यूशी झुंज देत रिंकू सिंग यांचा अखेर मृत्यू;

एसटी-एर्टिगा भीषण अपघात; १० दिवस मृत्यूशी झुंज देत रिंकू सिंग यांचा अखेर मृत्यू;

Published on

एसटी अपघातातील तरुणाचा मृत्यू
१० दिवसांची झुंज अपयशी; सुरक्षा उपाययोजनांचा अभाव उघड

कर्जत, ता. २० (बातमीदार) ः कर्जत-चौक रस्त्यावरील अपुऱ्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे अपघातांची मालिका सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी (ता. ११) झालेल्या एसटी बस आणि कारच्या भीषण अपघातातील गंभीर जखमी रिंकू सिंग (३३) याची १० दिवसांची झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी (ता. २०) मृत्यू झाला. त्यामुळे या रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित एसटीचालकावर खालापूर पोलिसांनी अपघातासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधून कर्जतकडे येणाऱ्या एसटीत ३९ प्रवासी होते. दरम्यान, कर्जतवरून पनवेलकडे जाणाऱ्या नेरळ येथील व्यावसायिक रिंकू सिंग यांच्या चारचाकीला या एसटीची जोरदार धडक बसली. या अपघातात रिंकू सिंग गंभीर जखमी झाले, तर त्यांच्यासोबत असलेले कामगार मोनू निषादही जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने कर्जत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रिंकू सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
...........................
कर्जत-चौक रस्त्याचे काँक्रीटीकरण अंतिम टप्प्यात असतानाही सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या रस्त्यावर दिशादर्शक फलक, मध्यरेषा (रोड मार्किंग), चेतावणी चिन्हे, गतिरोधक तसेच योग्य साइडपट्टी नसल्याने वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहेत. स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून, तातडीने सुरक्षा उपाययोजना करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, रस्ता विकासासाठी आहे, की मृत्यू वाढवण्यासाठी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com