वसई विरार महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदी मनोज पस्टील
वसई-विरार महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी मनोज पाटील
विरार ता. २० (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेची आज पहिली महासभा झाली. या सभेत विरोधी पक्षनेतेपदी भाजपचे मनोज पाटील यांची निवड महापौर अजीव पाटील यांच्याकडून घोषित करण्यात आली. या निवडणुकीत स्थायी समिती सदस्यांची निवडदेखील जाहीर करण्यात आली.
बहुजन विकास आघाडीतर्फे प्रवीण शेट्टी, नरेंद्र पाटील, लॉरेल डायस, पंकज पाटील, रंजना थालेकर, प्रफुल पाटील, चंद्रशेखर धुरी, सुनील आचोळकर, स्वप्निल कवळी, आलमगीर डायर तर भाजपकडून प्रज्ञा पाटील, महेश सरवणकर, दर्शना त्रिपाठी, निलेश चौधरी, जितेंद्र पाटील, अभय कक्कड यांची निवड करण्यात आली, तर सभागृह नेता म्हणून प्रफ्फुल साने यांची निवड जाहीर करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

