ठाणेकरांसाठी पर्यटनाची मेजवानी

ठाणेकरांसाठी पर्यटनाची मेजवानी

Published on

ठाणेकरांसाठी पर्यटनाची मेजवानी
‘सकाळ-थॉमस कूक’ भव्य हॉलिडे कार्निव्हलचे आयोजन

ठाणे, ता. २० : आरामदायी प्रवास, किफायतशीर बजेट आणि जास्तीत जास्त पर्यटनस्थळे पाहता यावीत, ही पर्यटकांची प्रमुख अपेक्षा असते. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ’ आणि ‘थॉमस कूक’ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवारी (ता. २२) ठाण्यात एका भव्य ‘हॉलिडे कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निव्हलमध्ये पर्यटकांना एकाच छताखाली देशविदेशातील सहलींची माहिती, सवलती आणि विविध ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. पर्यटनाला जाताना विश्वासू ट्रॅव्हल एजन्सी असणे अत्यंत महत्त्वाचे असते. आरामदायी प्रवास, किफायतशीर बजेट आणि जास्तीत जास्त पर्यटनस्थळे पाहता यावीत, ही पर्यटकांची प्रमुख अपेक्षा असते. हे सर्व निकष ‘थॉमस कूक’ पूर्ण करत असून, या कार्निव्हलमध्ये विशेष सुविधा उपलब्ध असतील.


उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम जवळ आला की, प्रत्येकाला फिरण्याचे वेध लागतात. मग हटक्या पर्यटनस्थळांचा शोध सुरू होतो. त्यामुळे भटकंतीची हीच गरज ओळखून चारधाम यात्रेपासून ते जागतिक दौऱ्यांपर्यंतचे अनेक पर्याय यात पर्यटकांसाठी उपलब्ध असतील. तसेच फॅमिली आणि ग्रुप बुकिंगवर विशेष सवलती देण्यात येणार आहेत. पर्यटकांना परवडणारे ईएमआयचे पर्याय ऑप्शन्स आणि आयसीआयसीआय बँकेकडून स्पेशल ऑफर्स देण्यात येत आहेत. सुरक्षित प्रवासासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्सबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विशेष गट सहली व ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सहलींचे नियोजन केले आहे.

वाचकांसाठी खास आकर्षणे
कार्निव्हलमध्ये केवळ माहितीच नाही, तर मनोरंजनाचीही मेजवानी असणार आहे. यामध्ये मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबासह सहभागी होऊन तुम्ही विविध खेळ आणि बक्षिसांचा आनंद घेऊ शकता. तसेच अल्पोपाहाराचीही सोय करण्यात आली आहे.

विशेष सवलती
‘सकाळ’च्या वाचकांसाठी ३५ हजार रुपयांपर्यंतची विशेष सवलत.
- कार्निव्हलमध्ये सहल बुक केल्यास मोफत ट्रॉली बॅग.
- पहिल्या ५० ग्राहकांना खास भेटवस्तू.

सुबोध भावेंसोबत स्वित्झर्लंडची सफर
३० मे २०२६ रोजी स्वित्झर्लंडमध्ये अभिनेते सुबोध भावे यांच्यासोबत गप्पागोष्टी करण्याची संधीही पर्यटकांना मिळणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील
ठाण्यातील चेक नाक्याजवळ हॉटेल टिप टॉप प्लाझा येथे २२ फेब्रुवारी रोजी स. १० ते सायं. ६ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

यंदाची उन्हाळी सुट्टी अविस्मरणीय करण्यासाठी व नाव नोंदणीसाठी ८६५७९४७१९३ या क्रमांकावर संपर्क करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com