तारापूर औद्योगिक क्षेत्रात पुन्हा आग

तारापूर औद्योगिक क्षेत्रात पुन्हा आग

Published on

तारापूर औद्योगिक क्षेत्रात पुन्हा आग
बोईसर, ता. २० (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्र येथे आज सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. एका कंपनीच्या केमिकलयुक्त टाकीला कचरा पेटवताना आग लागल्याचे स्थानिक कामगारांनी सांगितले. आग लागलेल्या ठिकाणाजवळ काम करणाऱ्या सुमारे २५ ते ३० कुटुंबांची प्लॅस्टिकची खोपटी असून, काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.
संबंधित कंपनीसमोर मोठ्या प्रमाणात रिकाम्या व वापरलेल्या टाक्या मोकळ्या जागेत अस्ताव्यस्त टाकण्यात आल्या आहेत. परिसरात अनेक कामगार कुटुंबे वास्तव्यास असून, सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याची तक्रार करण्यात आली आहे. अशा निष्काळजीमुळे जीवितहानी झाली असती, तर जबाबदार कोण, असा सवाल येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून, संबंधित विभागांनी या घटनेची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com