स्थायी समिती

स्थायी समिती

Published on

शिंदे, शिरवडकर यांची निवड
अनुक्रमे स्थायी समिती अध्यक्ष, शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः मुंबई महापालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रभाकर शिंदे यांची, तर शिक्षण समिती अध्यक्षपदी भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी पक्षाकडून दोन्ही समित्यांसाठी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज न आल्याने शिंदे आणि शिरवडकर यांची बिनविरोध निवड होणार, हे निश्चित झाले होते. आज स्थायी आणि शिक्षण समितीत महापौर रितू तावडे यांनी त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर १९३३ पासून आतापर्यंत एकूण ८० नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षपद भूषवले आहे.  भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीवर ८१ वे अध्यक्ष ठरले. तसेच, त्यांनी, १३ वर्षे स्थायी समितीवर काम केले होते. तसेच,  त्यांनी शिवसेनेच्या २५ वर्षांच्या सत्ता कालावधीत काही वर्षे सभागृह नेते म्हणूनदेखील काम केले होते. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करून मुलुंड येथील मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्या वेळी त्यांनी भाजपचे गटनेतेपदावर काम केले.

शिक्षण समितीच्या निवडणुकीत भाजपकडून अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर यांचा एकमेव अर्ज आला होता. तसेच, या निवडणुकीत विरोधात कोणीही अर्ज न भरल्याने पालिका नियमानुसार शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर यांची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले. राजेश्री शिरवडकर या चार वेळा नगरसेवकपदावर निवडून आल्या आहेत. त्यांनी स्थायी समितीवर सदस्य म्हणून काम केल्याने त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे भाजप पक्षाने त्यांना यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी उमेदवारी देत जबाबदारी दिली. 

विरोधी पक्षाकडून अभिनंदन
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांची निवड झाल्यावर महापौर रितू तावडे यांनी तसेच भाजपचे  गटनेते आणि सभागृहनेते गणेश खणकर, शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, काँग्रेस पक्षाचे गटनेते अश्रफ आजमी, मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या डॉ. सईदा  खान यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com