मनसे गटनेते किल्लेदार सत्ताधारी पक्षाच्या रांगेत
जोड बातमी
मनसे गटनेते किल्लेदार सत्ताधारी पक्षाच्या रांगेत
मुंबई महापालिकेत अनेक नगरसेवक हे प्रथमच नगरसेवक, कोणी गटनेते तर कोणी समिती अध्यक्ष बनले. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार हे स्थायी समितीवर सदस्य असून ते स्थायी समितीच्या बैठकीत निवडणुकीपूर्वी चुकून सत्ताधारी भाजपच्या सदस्यांच्या रांगेत बसले; मात्र नंतर कोणीतरी त्यांना ही बाब निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी जागा बदलून ते विरोधकांच्या रांगेत बसले.
एमआयएमचे गटनेते तत्काळ सभागृहाबाहेर पडले
एमआयएम पक्षाचे आठ उमेदवार या वेळी प्रथमच निवडणूक जिंकून नगरसेवक बनले. त्यांच्या पक्षाने विजय उबाळे यांना गटनेते बनवले; मात्र उबाळे यांनी स्थायी समितीवर जमीर कुरेशी यांचे सदस्य म्हणून नाव दिले होते. त्यामुळे कुरेशी अगोदरच स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांच्या रांगेत बसले होते; मात्र अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना विजय उबाळे हे सभेत आले आणि सदस्य संख्या वाढली कशी, असे चिटणीस यांच्या लक्षात आले. सभागृहात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यावर चिटणीस विभागाच्या कर्मचाऱ्याने उबाळे यांच्या चूक लक्षात आणून देताच ते खुर्चीवरून ताडकन उठले आणि सभागृहातून बाहेर गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

