हार - पुष्पगुच्छ नकोत; विद्यार्थ्यांसाठी वही - पेन द्या
विद्यार्थ्यांसाठी वही-पेन द्या
शिक्षण समिती अध्यक्ष शिरवडकर यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः शुभेच्छा देण्यासाठी कोणीही हार, पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू आणू नयेत. त्याऐवजी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपयोगी ठरणारी पुस्तके, वह्या, लेखन साहित्य किंवा अन्य शैक्षणिक वस्तू शुभेच्छा किंवा भेट म्हणून आणाव्यात, असे आवाहन पालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी केले आहे.
हार-पुष्पगुच्छ क्षणिक सन्मानाचे प्रतीक असले, तरी विद्यार्थ्यांसाठी दिलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षण व भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. या उपक्रमामुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक मदत मिळून आवश्यक मूलभूत साधनांची पूर्तता होणार आहे. औपचारिक शुभेच्छांऐवजी शिक्षणात गुंतवणूक करण्याचा हा सकारात्मक व सामाजिकदृष्ट्या उपयुक्त संदेश असल्याचे शिरवडकर यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

