जव्हार परिसरात 
बिबट्याचा वावर

जव्हार परिसरात बिबट्याचा वावर

Published on

जव्हार परिसरात
बिबट्याचा वावर

जव्हार, ता. २० ः ताडाची माची जंगल परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याने शेतकऱ्याची गाय फस्त केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २०) दुपारी घडली. गेल्या दोन वर्षांपासून सोनारआळी परिसर व मागील दरी भागात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असताना वनविभागाकडून काही उपाय करण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ताडाची माची या जंगल परिसरात चरण्यासाठी गेलेल्या गाईवर बिबट्याने अचानक झडप घालत तिला सुमारे १२ फूट जंगलात फरपटत नेले. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वारंवार होत असलेल्या घटनांनंतरही ठोस उपाययोजना न केल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिबट्यांचा वाढता वावर थांबवण्यासाठी तातडीने पिंजरे लावणे, गस्त वाढवणे, कॅमेरे बसवणे व प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वनविभागाकडून या घटनेचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्यात येईल, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवणे व जनजागृतीसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती उपवनसंरक्षक सैफून शेख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com