एसटी कामगारांचे "बोंब मारो" आंदोलन स्थगित

एसटी कामगारांचे "बोंब मारो" आंदोलन स्थगित

Published on

एसटी कर्मचाऱ्यांचे ‘बोंब मारो’ आंदोलन स्थगित
मुंबई, ता. २० : एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना वेतनासोबत या महिन्यात वेतनवाढ फरक हप्ता न मिळाल्याने असंतोष पसरला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांचा निषेध करत ‘बोंब मारो’ आंदोलनाची नोटीस एसटी कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात आली होती; पण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारामुळे हा निधी देण्यास अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवला असून तात्पुरत्या स्वरूपात १०० कोटी रुपये इतकी रक्कम एसटीला देण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून आझाद मैदानात होणारे ‘बोंब मारो’ आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com