नवी मुंबई विमानतळावर ‘डिजीयात्रा’

नवी मुंबई विमानतळावर ‘डिजीयात्रा’

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने केंद्र सरकारच्या नागरी विमानचालन मंत्रालयाच्या ‘डिजियात्रा’ या महत्त्वाकांक्षी देशव्यापी मोहिमेत अधिकृतपणे सहभाग नोंदवला आहे. नवी मुंबई विमानतळासह देशातील इतर पाच विमानतळांवर या सुविधेला एका विशेष कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली.

‘डिजियात्रा’ ही प्रणाली फेशियल रिकग्निशन (चेहरा ओळख) तंत्रज्ञानावर आधारित असून, याद्वारे प्रवाशांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय विमानतळावर प्रवेश आणि सुरक्षा तपासणी पूर्ण करता येणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या टर्मिनलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात या सुविधेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. याप्रसंगी तीन प्रवाशांनी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक ई-गेट्सचा वापर केला. यामुळे आता प्रवाशांचा चेहराच त्यांचे ओळखपत्र आणि बोर्डिंग पास म्हणून ओळखला जाणार आहे.

नागरी विमानचालन मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या प्रणालीमुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. पारंपरिक पद्धतीने ओळखपत्रांची तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या १५ ते २० सेकंदांच्या तुलनेत, डिजियात्रा ई-गेट्सवर ही प्रक्रिया अवघ्या पाच सेकंदांत पूर्ण होते. महत्त्वाचे म्हणजे, प्रवाशांच्या गोपनीयतेची काळजी घेण्यात आली आहे. प्रवाशांची माहिती कोणत्याही केंद्रीय डेटाबेसमध्ये साठवली जात नाही, तर ती प्रवाशांच्या स्वतःच्या मोबाईलमधील ‘डिजिटल वॉलेट’मध्ये सुरक्षित राहते आणि प्रवासाच्या २४ तासांनंतर विमानतळाच्या सिस्टीममधून काढून टाकली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com