गंजाड–सोमनपाडा–दसरा पाडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य
गंजाड-सोमन पाडा-दसरा पाडा रस्ता तातडीने दुरुस्तीची करण्याची नागरिकांची मागणी
कासा, ता. २१ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील गंजाड, सोमन पाडा व दसरा पाडा परिसरातून जाणारा सुमारे तीन ते चार किलोमीटर लांबीचा अंतर्गत रस्ता सध्या अतिशय दयनीय अवस्थेत आहे. येथे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता पूर्णतः नादुरुस्त झाला असून, वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावरून गंजाड गावांतर्गत अनेक नागरिकांचा रोजचा प्रवास होतो. मात्र दुचाकी चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण ठरत असून, रस्त्याचा थर उखडून खडी बाहेर आल्याने धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे पद्मश्री पुरस्कारप्राप्त कै. जीवा सोमा म्हसे यांच्या घराकडे हाच रस्ता जातो. येथे मातीच्या रंगांचे संमेलन पार पडत असून, राज्यासह देशभरातून येथे आलेल्या अनेक पर्यटकांना या खराब रस्त्यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे.
या मार्गावरून शाळकरी मुले, वृद्ध नागरिक तसेच रुग्णांची नियमित ये-जा असते. खड्डमय रस्त्यांमुळे प्रवास कठीण झाला असून, रुग्णवाहिकांनाही अडथळे येत आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष देऊन रस्ता सुधारावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
--------------
कोट
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. चालत जाणेही त्रासदायक झाले असून, दुचाकी चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण आहे. अनेक वेळा मागणी करूनही अद्याप दुरुस्ती झालेली नाही. दोन दिवसांवर येथे आदिवासी संस्कृती जपणारे मातीचे संमेलन होत आहे.
- अनिल वांगड, आंतरराष्ट्रीय वारली चित्रकार
-----------
गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने मागणी करीत आहोत. अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. लवकरच ग्रामपंचायतीमार्फत पुन्हा निवेदन देणार आहोत.
- अभिषेक देसक, सरपंच, गंजाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

