कौशल्ये’ 
विषयावर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम

कौशल्ये’ विषयावर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम

Published on

अध्यापक विकास कौशल्य कार्यक्रम उत्साहात

विरार, ता. २२ (बातमीदार) : वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा लेखा विभाग आणि महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या समन्वयाने तीन दिवसांचे ‘वर्गातल्या अध्यापनातील सादरीकरण कौशल्य’ या विषयावर अध्यापक विकास कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आयसीटी अकॅडमी या संस्थेच्या सहकार्याने हे कार्यक्रम पार पडले.
शिक्षकांच्या वर्गातील सादरीकरण कौशल्याचा प्रभाव वाढवणे, संवादपद्धती अधिक परिणामकारक करणे तसेच विद्यार्थीकेंद्री अध्यापन तंत्रे विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी आयसीटी अकॅडमीचे प्रशिक्षक मोहम्मद आदिल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सहा वर्षांहून अधिक प्रशिक्षणाचा अनुभव असलेल्या आदिल यांनी संवादकौशल्य, रोजगारक्षमतेस पूरक कौशल्ये, आत्मविश्वास वृद्धी आणि अनुभवाधारित अध्यापन यांवर मार्गदर्शन केले. प्रभावी सादरीकरणाचे घटक, शिकण्याच्या विविध शैली, विद्यार्थीकेंद्री अध्यापन पद्धती, केस स्टडीआधारित शिक्षण तसेच स्वयंमूल्यमापन या विषयांवर त्यांनी सत्रे घेतली. महाविद्यालयाच्या विविध विभागांतील एकूण ५० प्राध्यापकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या उद्‍घाटन व समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके, डॉ. दीपा कत्रे तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. हिरानंद खंबायत उपस्थित होते. प्रा. वंदना केडिया यांनी या कार्यक्रमाचे समन्वयन केले. या उपक्रमामुळे अध्यापन अधिक प्रभावी, संरचित व विद्यार्थीकेंद्री करण्यास निश्चितच हातभार लागेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com